चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी गावातील लग्नसमारंभात जेवणातून विषबाधा होऊन , अनेक जण आजारी झाले . त्यांच्यावर उपचार करून , १०० हुन अधिक जणांना घरी पाठवण्यात आले . मात्र यापैकी एका व्यक्तीची दृष्टी गेल्याचे निदान झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी बीम्स रुग्णालय दाखल करण्यात आले आहे .
हिरेकोडी गावातील लग्न समारंभात जेवल्याने , गावातील १०० हुन अधिक लोकांना उलट्या आणि जुलाब सुरु झाल्याने त्यांना चिकोडी सार्वजनिक रुग्णालय तसेच आसपासच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . प्रकृती स्थिर असल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले . मात्र यापैकी बाबासाब बेग या ३२ वर्षीय व्यक्तीची दृष्टी अधू झाल्याने , त्याला मिरज येथे अधिक उपचारासाठी जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला . मात्र कुटुंबियांनी त्याला बेळगावच्या बीम्स हॉस्पिटल मध्ये दाखल केले . यासंबंधी रुखसाना बाबासाब बेग यांनी इन न्यूजला माहिती दिली .
बाबासाब बेग यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले कि , जेवणातून विषबाधा झाल्याने , बाबासाब बेग याना उलट्या आणि जुलाब होऊन , डिहायड्रेशन होऊन शरीरातील रक्तातील पाण्याचे प्रमाण कमी झाले . त्यामुळे त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नसावा आणि म्हणूनच त्यांच्या नजरेवर परिणाम झाला असावा . आम्ही आम्ही एमआरआय करून खात्री करून घेऊ . बीम्स कडून सर्व योग्य उपचार देण्यात येतील असे डॉक्टरांनी सांगितले .
Recent Comments