Belagavi

कुख्यात गुन्हेगार बन्नंजे राजाचे बीम्समध्ये सिटीस्कॅन

Share

कारवार येथील उद्योगपती नायक यांच्या हत्याप्रकरणी बेळगावच्या हिंडलगा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुन्हेगार बन्नंजे राजा आजारी पडला आहे. त्यामुळे त्याला जेल पोलिसांकडून तातडीने बीम्स जिल्हा रुग्णालयात आणून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
उद्योगपती नायक यांच्या हत्याप्रकरणी कुख्यात गुन्हेगार बन्नंजे राजा याला न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्याला बेळगावच्या हिंडलगा तुरुंगात डांबण्यात आले आहे. त्याने प्रकृती बिघडल्याची तक्रार केल्यानंतर हिंडलगा तुरुंग प्रशासनाची धावपळ उडाली. आज सकाळी त्याला तुरुंग पोलिसांनी त्याला कडेकोट बंदोबस्तात बेळगावच्या बिम्स सरकारी रुग्णालयात आणले. कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांनी हिंडलगा कारागृहातून बिम्स रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांकरवी त्याचे सिटी स्कॅन करण्यात आले. त्यानंतर त्याला पुन्हा कडेकोट बंदोबस्तात कारागृहात नेण्यात आले. बन्नंजे राजा हा अंडरवर्ल्डशी संबंधित खतरनाक गुन्हेगार असल्याने यावेळी सशस्त्र पोलिसांची कडी सुरक्षा ठेवण्यात आली होती.

Tags: