बेळगावहून गोव्याला जोडणाऱ्या चोर्ला रस्त्यावर दोन अवजड वाहनांचा भीषण अपघात झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
दोन अवजड वाहनांची विचित्र पद्धतीने टक्कर झाल्याने चोर्ला रस्त्यावरील गोवा आणि बेळगावकडे येणारी वाहने अडकून पडली आहेत. एक ट्रक दुसऱ्या ट्रकला समोरील बाजूने ठोकरून रस्त्याच्या मधोमध आडवा उभा राहिल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. दुचाकी जाईल इतकी जागाही शिल्लक नसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. घटनास्थळी पोलीस आणि बांधकाम खात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असून, लवकरच बेळगाव-चोर्ला रस्ता वाहतुकीस खुला होईल असे सांगितले आहे.
Recent Comments