फीट्सच्या आजाराच्या त्रासाला कंटाळून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हरसनवाडी गावात घडली.रोशन रेमन फर्नांडिस, वय 25, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत त्याचे वडील रेमन फर्नांडिस यांनी खानापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा रोशन फर्नांडिसला दोन वर्षांपासून फिट्सचा त्रास होत होता. त्यामुळे त्याच्यावर खानापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारामुळे नैराश्येने ग्रासल्याने त्याने आत्महत्या केली असावी, असे त्यांनी तक्रारीत लिहिले आहे.
याप्रकरणी खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय चन्नबसव बबली व सहकारी पुढील तपास करत आहेत.
Recent Comments