बेळगाव तालुक्यातील गौंडवाड गावात श्री हनुमान आणि श्री कलमेश्वर मंदिर वास्तुशांत आणि मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात भक्तिभावाने पार पडला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

गौंडवाड देवस्की पंच कमिटी आणि श्री हनुमान आणि श्री कलमेश्वर मंदिर जीर्णोद्धार समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने श्री हनुमान आणि श्री कलमेश्वर मंदिर वास्तुशांत आणि श्री जोतिबा, श्री शिवलिंग मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित केला होता. रविवारी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम, अभिषेक, वास्तुशांत सोहळा आदी कार्यक्रम पार पडले. गावकऱ्यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमाचे उदघाटन केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, श्रीराम हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर, ऍड. कुलकर्णी, राजेंद्र पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. फ्लो
यावेळी बोलताना केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील म्हणाले की, या भागाचे आमदार व सार्वजनिक बांधकाम खात्याचे आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र म्हैसूर येथे होणाऱ्या
गृहलक्ष्मी योजनेच्या लोकार्पण सोहळ्याच्या तयारीत ते गुंतले असल्याने येऊ शकले नाहीत. त्यांचे पुत्र युवा काँग्रेस नेते राहुल जारकीहोळी कार्यक्रमाला येणार आहेत. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी या मंदिराच्या उभारणीसाठी आमदार फंडातून पाच लाख रुपये मंजूर केले आहेत. त्याशिवाय गावात विकासकामांसाठी सुमारे ५० लाख रुपये मंजूर करून विविध विकासकामे घडवून आणली आहेत. ते सदैव गौंडवाड आणि मतदारसंघात येणाऱ्या गावांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. या गावात हनुमान, कलमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा हे ग्रामस्थांचे स्वप्न होते. त्यासाठी सतीश पाटील या उमद्या युवा कार्यकर्त्याने आपले प्राणही पणास लावले. आज गावकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे, ही समाधानाची बाब आहे. अशीच एकी ठेवून गावचा विकास साधा असे आवाहन मलगौडा पाटील यांनी केले.
याप्रसंगी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे पुत्र युवा काँग्रेस नेते राहुल जारकीहोळी आणि मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी देणगी व विविधमार्गे सहकार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. फ्लो.
कार्यक्रमाला यल्लोजी पाटील, हिंडाल्कोचे मयूर कृष्णा, अभिजित बंडी, मंदिर समितीचे पदाधिकारी तसेच गौंडवाड तसेच परिसरातील विविध गावांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments