Mysuru

मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांनी घेतले चामुंडेश्वरी मातेचे दर्शन

Share

कर्नाटक प्रदेश काँग्रेस  ने म्हैसूरच्या चामुंडेश्वरी देवीची भक्तिभावाने पूजाअर्चा केली . मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज (29 ऑगस्ट) चांमुडेश्वरी मातेला हिरवी आणि लाल साडी, अननस , चमेली, गुलाबाच्या फुलांचा हार आणि फळे अर्पण करून चामुंडेश्वरी मातेचे दर्शन घेतले .

विधानसभा निवडणुकीदरम्यान 9 मे रोजी त्यांनी चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन , हमी योजनांच्या अंमलबजावणीबाबत आश्वासन दिले होते. आता ती मागणी पूर्ण झाल्याने त्यांनी चामुंडेश्वरी देवीला पहिल्या गृहलक्ष्मी योजनेसाठी 2000 रुपयांची देणगी देखील दिली. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी प्रत्येकी २ हजार रुपये आणि नैवेद्य अर्पण केला .

चामुंडेश्वरी मातेची पूजा केल्यानंतर सिद्धरामय्या यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली, 9 मे रोजी मी डीके शिवकुमार यांनी चामुंडी हिलला भेट दिली. आम्ही 5 हमीभाव लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज आपण चामुंडेश्वरीच्या दर्शनासाठी येऊन , नवस फेडला आहे. उद्या गृहलक्ष्मी योजना कार्यक्रमाचा शुभारंभ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हैसूर जिल्ह्याचे प्रभारी मंत्री एच.सी. महादेवप्पा, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी देखील मुख्यमंत्री , आणि उपमुख्यमंत्र्यांसमवेत , चामुंडी टेकडीवर जाऊन माता चामुंडेश्वरीचे दर्शन घेतले आणि पूजा केली.

Tags: