Belagavi

हनुमान नगरात श्रद्धा-भक्तीने ललिता सहस्त्रनाम पठण, कुंकुमार्चन

Share

बेळगावातील हनुमान नगरातील हनुमान मंदिरात श्रावण मासानिमित्त आज श्रद्धा-भक्तीने ललिता सहस्त्रनाम पठण, कुंकुमार्चन सोहळा पार पडला.

पवित्र श्रावण मासानिमित्त हनुमान मंदिरात आज मंगळवारी ललिता सहस्त्रनाम पठण, कुंकुमार्चन सोहळा आयोजित केला होता. हनुमान नगर व परिसरातील महिलांनी मोठ्या श्रद्धा-भक्तीने या सोहळ्यात सहभागी होऊन देवीची आराधना केली तसेच एकमेकीला हळदी-कुंकू देऊन शुभेच्छा दिल्या. बी. के. मॉडेल हायस्कूलचे शिक्षक रामचंद्र भट यांनी धार्मिक विधी व पूजेचे पौराहित्य केले.

या संदर्भात इन न्यूज माहिती देताना हनुमान नगर हनुमान मंदिर महाप्रसाद समितीचे पदाधिकारी दिवाकर देशपांडे यांनी सांगितले की, दरवर्षी प्रमाणे हनुमान मंदिरात हनुमाननगर व परिसरातील महिलांनी श्रावण मासानिमित्त ललिता सहस्त्रनाम पठण, कुंकुमार्चन सोहळा आयोजित केला आहे. हनुमान मंदिर महाप्रसाद समितीने त्यांना सर्व सहकार्य केले आहे. मोठया श्रद्धेने, भक्तीने महिलांनी यात भाग घेतला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सर्वत्र चिंताजनक वातावरण आहे. त्यामुळे चांगला पाऊस पडू दे आणि सर्वांचे चांगले होऊ दे अशी प्रार्थना देवाकडे करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना महिला भक्त संध्या भट यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे आम्ही श्रवणानिमित्त ललिता सहस्त्रनाम पठण, कुंकुमार्चन सोहळा उपक्रम राबवला आहे. याला मंदिर महाप्रसाद समितीचे अध्यक्ष राहुल मेत्री, दिवाकर देशपांडे, अलगुंडी यांचे आम्हाला सहकार्य केले आहे. यात हनुमान नगरसह परिसरातील उपनगरांतील महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. यंदा चांगला पाऊस होऊ दे, सर्वांचे कल्याण होऊ दे अशी लोककल्याणासाठी प्रार्थना देवीकडे करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी महिलांनी मंदिरात सामूहिक ललिता सहस्त्रनाम पठण केले तसेच एकमेकीला हळदीकुंकू देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी हनुमान मंदिर महाप्रसाद समितीचे अध्यक्ष राहुल मेत्री, दिवाकर देशपांडे, अलगुंडी, रामचंद्र भट यांच्यासह हनुमान नगर परिसरातील महिला उपस्थित होत्या.

Tags: