मागील सरकारमध्ये झालेल्या सर्व घोटाळ्यांची आम्ही सखोल चौकशी करू, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
बेळगावात रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, लोकसभेची तयारी अजून झालेली नाही, निवडणुकीला अजून वेळ आहे, मागील सरकारच्या कार्यकाळात अनेक गंभीर घोटाळे झाले आहेत. दहा रुपयांचा मास्क शंभर रुपयांना विकण्यात आलाय, याची चौकशी झाली पाहिजे, आम्ही चौकशी करू, पक्ष सोडून गेलेल्यांना आम्ही परत बोलावणार नाही, त्यांना त्रास देण्याचा प्रश्नच येत नाही.
मात्र आम्ही सुधाकर यांची चौकशी जरूर करू, कारण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, असे त्यांनी सांगितले. प्रियांका जारकीहोळी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर, याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही, आमच्याकडे अनेक इच्छुक आहेत, असे ते म्हणाले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत आणि आम्ही सर्व एक आहोत, असे ते म्हणाले. नैतिक पोलिसिंगबद्दल उत्तर देताना मंत्री म्हणाले की, जिल्ह्यात नैतिक पोलिसिंगला परवानगी नाही आणि हिंडलगा कारागृहातील कैद्यांना मोबाईल फोन उपलब्ध करून देण्याच्या प्रकरणाची पोलीस अधिकारी चौकशी करतील असे त्यांनी सांगितले. .
एकंदर, मागील भाजप सरकारच्या काळात कोरोनावेळी दहा रुपयांचा मास्क शंभर रुपयाला विकला गेल्याचे आरोप असल्याच्या पार्श्वभूमीवर मागील सरकारच्या काळातील घोटाळ्यांची चौकशी करण्याचा इशारा मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिलाय. यावर आता भाजप काय भूमिका घेतो हे पाहणे कुतूहलाचे ठरेल.


Recent Comments