बेळगावात मॉरल पोलिसिंगला परवानगी नाही, यात आरोपी कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत असे बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी सांगितले.
बेळगाव शहरातील ख्रिश्चन कमिटीच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमाला आलेले आमदार आसिफ सेठ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, नुकतीच शहरात झालेल्या मॉरल पोलिसगिरीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही, शहर किंवा जिल्ह्यात मॉरल पोलिसगिरीला परवानगी नाही. आरोपी कोणत्याही जाती-धर्माचा असो, समाजविघातक जो कोणी असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे असे सांगितले.
लोकसभा निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नासाठी आम्ही निवडणुकीची तयारी करत आहोत, पक्षात अनेक इच्छुक आहेत, प्रकाश हुक्केरी हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना अथवा पक्ष ज्यांना तिकीट दिले आहे त्यांच्यासाठी आम्ही काम करू. आमच्याकडे हायकमांड देईल तो आदेश पाळण्याची प्रथा आहे.
माजी आमदार फिरोज सेठ लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीत. रमेश जारकीहोळी किंवा रमेश कत्ती काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत मला माहिती नाही. ते हायकमांड ठरवतील.
ज्यांनी पूर्वी काँग्रेस सोडून गेले होते त्यांनी पक्षनेतृत्व, विचारधारा मान्य करून पुन्हा आमच्या पक्षात प्रवेश केला त्यांचे आम्ही स्वागतच करू असे आ. सेठ यांनी सांगितले.
एकंदर, बेळगावात नैतिक पोलिसगिरी चालू देणार नसल्याचे आ. राजू सेठ यांनी स्पष्ट केले आहे.


Recent Comments