Banglore

इस्रोच्या भेटीप्रसंगी मोदींचा भव्य रोड शो, पण नेत्यांची भेट नाही; काँग्रेसने साधला निशाणा

Share

चांद्रयान-3 च्या यशाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यासाठी बंगळुरमध्ये दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाजतगाजत रोड शो केला. दरम्यान, राज्य भाजपच्या नेत्यांना न भेटताच मोदी दिल्लीला परतल्याने काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.

मोदींचे बंगळुरूमधील जालहळ्ळी क्रॉसजवळ पेन्या येथील इस्रो केंद्रात आगमन झाल्यावर हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी जमले. मोदींचे पोस्टर आणि राष्ट्रध्वज घेऊन एचएएल विमानतळाबाहेर रस्त्यावर जमलेल्या चाहते व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांनी मोदींचे भव्य स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एचएएल विमानतळाजवळ कारमधून खाली उतरून लोकांना अभिवादन केले. तिरंगा ध्वज हातात धरून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एचएएल विमानतळावरून मोदी पेन्या येथील इस्रोच्या मुख्यालयाकडे रवाना झाले. परंतु इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केल्यानंतर पंतप्रधान मोदी राज्यातील भाजप नेत्यांची भेट न घेता दिल्लीला परतले.

भाजप खासदार आणि आमदारांना मोदींनी रस्त्याच्या कडेला उभे केलेले पाहून काँग्रेसने ‘अरे, किमान सौजन्यही नाही’ असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली. प्रदेश भाजपचे ‘चक्रवर्ती’, सम्राट नेते रस्त्यावर! लाजिरवाण्या पराभवानंतर भाजप आणि मोदींच्या हायकमांडने राज्यातील नेत्यांना सामावून न घेता रस्त्यावर उतरवल्याचा पुरावा ही दृश्ये आहेत! नेत्यांना भेटण्याची ‘किमान शालीनता नाही’, असे ट्विट काँग्रेसने केले आहे.

राज्यातील भाजप नेत्यांना हायकमांडचे नेते साधी किंमत देत नाहीत. मोदींचा राग शांत झाल्याशिवाय विरोधी पक्षनेता निवडला जाणार नाही, मोदींचा राग शांत होणार नाही! भाजप नवा प्रदेशाध्यक्ष नेमणार की नाही, याबाबत साशंकता, विद्यमान अध्यक्षांना रस्त्यावर आणले! काँग्रेसने बॅरिकेडच्या मागे उभे असलेले भाजप आमदार आणि खासदारांचे फोटो ट्विट करत म्हटले आहे की, हे चित्र कर्नाटक भाजप अनाथ झाल्याचा पुरावा आहे.

Tags: