Dharwad

धारवाडमध्ये पीओपी गणेशमूर्ती जप्त

Share

गणेशोत्सव जवळ येताच धारवाड शहरातील विविध भागात गणेशमूर्ती विक्रीची दुकाने थाटली आहेत. या गणेशमूर्ती विक्री केंद्रांना धारवाडचे उपविभागीय अधिकारी अशोक तेली यांनी भेट देऊन पीओपीच्या गणेशमूर्ती जप्त केल्या.

धारवाडचे उपविभागीय अधिकारी अशोक तेली यांनी श्रीनगर, सप्तपूर, नेहरूनगरसह धारवाडमधील विविध भागातील गणपती मूर्ती विक्री दुकानाला भेट देऊन पीओपी गणपती मूर्ती जप्त केल्या. पीओपी गणपतीच्या बंदीबाबतही लोकांना जागरूक करण्यात आले आहे. पीओपी गणपती मूर्तीची विक्री करणे बेकायदेशीर आहे.

याबाबत कारवाई करण्यात येणार असल्याचे धारवाडचे उपविभागीय अधिकारी अशोक तेली यांनी सांगितले. दरम्यान, या कारवाईबाबत मूर्तिकार, विक्रेते, भाविकांतून मात्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: