Belagavi

घरफोड्याला अटक करून , दहा लाखांचे दागिने जप्त

Share

एका घरफोड्याला जेरबंद करून ,त्याच्याकडून 10 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात बेळगाव शहरातील मार्केट स्टेशनच्या पोलिसांना यश आले आहे.

२० ऑगस्ट रोजी मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थ नगर येथील घरातून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट उपविभागाचे एसीपी ए.एन.व्ही.बरमणी आणि त्यांच्या पथकाने पीआय महांतेश धामन्नावर यांच्या नेतृत्वाखाली आरोपी यासीन हसिम शेख (23) या निपाणीतील आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 231 ग्रॅम सोने व 140 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

अटक केलेल्याकडून सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून चौकशी सुरू आहे.

 

पीआय महांतेश धामन्नावर, पीएसआय विठ्ठल हवण्णावर, महांतेश मठपती व कर्मचारी सरथकुमार खानापुरे, विश्वनाथ माळगी, शंकर कुगटोली, खादरसाब खनम्मनवर, लक्ष्मण कडोलकर, आशीर जमादार, शिवानंद चांडकी, विनोद जगदाळे, शिवप्पा तेलीनवीन कुमार यांनी या गुन्ह्याच्या तपासात मेहनत घेतली. त्यांच्या या कामाचे पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांनी कौतुक केले आहे

Tags: