जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये जिल्ह्याबाहेरील लोकांनीही फोन करून अवैध दारू विक्री, मटका, जुगार, वाहतूक समस्या, दुचाकीस्वारांचा कर्कश आवाज, जमिनीचा वाद, कौटुंबिक समस्या, वाळूची अवैध वाहतूक, भटक्या कुत्र्यांच्या त्रास अशा विविध तक्रारी एसपींच्या फोन इन कार्यक्रमात नागरिकांनी आज मांडल्या.
जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या सभागृहात आज शनिवारी 18 वा फोन-इन कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक नागरिकांनी विविध स्वरूपाच्या तक्रारी, समस्या एसपींना फोन करून सांगितल्या. त्यावर एसपी संजीव पाटील यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून तत्काळ तोडगा काढला. फ्लो
रायबाग तालुक्यातील चिंचली गावात एक दारू दुकान 24 तास सुरू असते. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार एका नागरिकाने केली.
सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी गावातील जमिनीच्या वादाची तक्रार करण्यात आली. बैलहोंगल शहरात जमीन व्यवहारात एकाने आपल्या आईकडून दीड लाख रुपये जाडा घेतले आहेत, ते पैसे परत करण्यासाठी एसपीकडे एका व्यक्तीने फोन करून तक्रार केली.
यरगट्टी तालुक्यातील बुदीगोप्प गावातील एका व्यक्तीने फोन केला आणि गावात उपद्रवी लोकांचा मोठा आवाज असून दुचाकीस्वार मोठा आवाज करत लोकांना त्रास देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार केली.
रायबाग तालुक्यात मटका व जुगाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सट्टेबाजांवर कारवाई करावी, अशी तक्रार एका व्यक्तीने फोन करून केली.
गोकाक शहरामध्ये सोसायटीची 50 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत तक्रार करण्यासाठी गेले असता पोलिस गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करत असल्याची तक्रार एकाने केली.
बैलहोंगल तालुक्यातील गुरगुंड गावातील मशिदीच्या मागे पत्ते खेळून जुगाराचा अड्डा भरविण्यात येत आहे. त्यांच्यावर छापा टाकून कारवाई करण्याची मागणी एका व्यक्तीने तक्रार करून केली.
बेळगाव शहरातील भाग्यनगरातील ज्येष्ठ नागरिकांनी फोन करून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याची तक्रार केली. महापालिकेकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. लहान मुले, महिला व वृद्धांना रस्त्यावरून ये-जा करणे अशक्य झाले आहे. मोकाट कुत्र्यांवर आळा घालण्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांना सांगा, असे ते म्हणाले.
शहापूर, एपीएमसी, मार्केट, बेळगाव ग्रामीण, टिळकवाडी, बागलकोट, हुबळी येथील लोकांनीही फोन करून समस्या मांडल्या.
त्यांनी जनतेच्या सर्व आवाहनांना प्रतिसाद देत एसपी संजीव पाटील यांनी संयमपूर्वक लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक वेणुगोपाल, डीवायएसपी वीरेश दोडमनी, सीपीआय बी. आर. गड्डेकर, महादेव एस.एम., बाळाप्पा तळवार, पोलीस कर्मचारी श्रीशैल पासिगर, विठ्ठल मादार आदी उपस्थित होते.


Recent Comments