बेळगावातील हनुमान नगरातील हनुमान सर्कलजवळ अतिक्रमण केल्यावरून महानगरपालिकेने काही विक्रेत्यांची खोकी दुकाने नुकतीच हटवली होती. त्या विक्रेत्यांचे आ. राजू सेठ यांच्याकडून पुनर्वसन करण्यात आले आहे.

हनुमान नगरातील रस्त्यांवरील अतिक्रमण केलेले सर्व स्टॉल हटविण्याचे काम बेळगाव महानगरपालिकेने केले होते. हनुमान सर्कलजवळील स्टॉल हटविण्यात आल्याने गोरगरीब विक्रेत्यांपुढे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता.
याची दखल घेऊन बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी हनुमान नगरमधील विक्रेत्यांसाठी नवीन जागा निश्चित केली आहे. माजी आमदार फिरोज सेठ यांच्यासह त्यांनी या जागेचे उद्घाटन केले.


Recent Comments