बेळगाव जिल्ह्यातील जनतेच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीम शनिवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत 18 वा फोन-इन कार्यक्रम करणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील जनतेचा प्रश्न केवळ एका फोनने सोडवणे शक्य आहे. फोन-इन कार्यक्रम शनिवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत आयोजित केला जातो. याचा जिल्ह्यातील जनतेने लाभ घ्यावा.
तुमच्या अखत्यारीतील पोलिस ठाण्यात समस्यांबाबत स्थानिक पोलिस तक्रार नोंदवत नसल्यास, तुम्ही दिलेल्या अर्जाची चौकशी होत नसल्यास, अवैध दारू विक्री, चोरांचा धोका यासह इतर प्रकरणांसंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे फोन-इन कार्यक्रमात तक्रार करता येते. यासाठी 0831-2405226 या क्रमांकावर कॉल करून जनतेला तक्रार करता येईल. यावर तोडगा काढण्यात येईल असे जिल्हा पोलीस विभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


Recent Comments