Khanapur

बेळगाव महापालिकेच्या उपायुक्तपदी रेश्मा तालिकोटी यांची नियुक्ती

Share

बेळगाव मलप्रभा आणि घटप्रभा प्रकल्पांच्या उपप्रशासक असलेल्या रेश्मा तालिकोटी यांची बेळगाव महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी रेश्मा तालिकोटी यांनी भूसंपादन विभागात विशेष भूसंपादन अधिकारी आणि खानापूरच्या तहसीलदार म्हणून काम पाहिले आहे.

आता त्यांची बेळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. एक कुशल प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

Tags: