Kagawad

उगारच्या श्री कोठरी लक्ष्मी देवीची जत्रा

Share

श्रावण महिन्यातील शुक्रवारी, उगारच्या श्री कोठरी लक्ष्मी देवीचा जत्रा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

शुक्रवारी सकाळपासूनच विविध कार्यक्रम व पूजाविधी पार पडला.
कृष्णा नदीचे पूजन करण्यात आले आणि पालखी मिरवणुकीत पाण्याचे कलश घेऊन लोक बैलगाड्यांसह मिरवणुकीने आले आणि देवीला पाण्याचा अभिषेक केला.

गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस पूर्णपणे थांबल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. प्रत्येकाजण पावसासाठी देवीची पूजा करीत आहे .
आश्चर्याची बाब म्हणजे मंदिरात आरती पूजा सुरू असताना सुमारे अर्धा तास पाऊस पडला आणि सर्व शेतकरी व भाविकांनी आनंदाने देवीचा जयघोष केला.

देवीच्या भक्तांनी दान केलेल्या सुमारे 16 क्विंटल महाप्रसादाचे वाटप करण्यात आले व हजारो महिला व पुरुष भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

स्थानिक पीकेपीएस अध्यक्ष दिलीप उल्लोली, दिलीप कुसुनाळे, बाबू निंबकर, काटकर व देसाई बंधू, नगरसदस्य महादेव वडगावे, महिला भक्त श्वेता दलाल , छाया पाटील, इंदुमती बस्तवडे, शारदा तुरशी, सरला सिंदे, शोभा शिंदे यांच्यासह लक्ष्मीदेवीचे भक्त उपस्थित होते. जत्रा यशस्वी होण्यासाठी भक्तानी अथक परिश्रम घेतले.

Tags: