Belagavi

मार्कंडेय निवडणुकीसाठी कडोली परिसरात अविनाश पोतदार पॅनेलचा प्रचार

Share

काकती येथील मार्कंडेय शुगर फॅक्टरीची निवडणूक येत्या रविवारी होणार आहे. यासाठी अविनाश पोतदार पॅनेलच्या वतीने कडोली परिसरात प्रचाराला प्रारंभ करण्यात आला.
मार्कंडेय शुगर फॅक्टरीची निवडणूक अविनाश पोतदार पॅनेल विरुद्ध तानाजी पाटील पॅनेलमध्ये होणार आहे. यासाठी अविनाश रामभाऊ पोतदार पॅनेलतर्फे कडोली गावाजवळील गुंजेनट्टी गावची ग्राम देवता श्री होळी कामाण्णाला साकडे घालुन प्रचाराला प्रारंभ करण्यात आला.

या पॅनेलमध्ये सामान्य गटातून अनिल पावशे, अनिल कुट्रे, अविनाश पोतदार, अशोक नाईक, बसवंत मायाण्णाचे, बाबुराव पिंगट, यल्लाप्पा रेमाण्णाचे, अनुसुचित जाती गटातुन चेतक कांबळे, अनुसूचीत जमाती गटातुन सत्याप्पा मुचंडी, ओबिसि अ वर्गातून उदय सिद्धण्णवर, ओबिसि ब वर्गातून मनोहर हुक्केरीकर, महिला वर्गातून निलिमा पावशे व सुधा म्हाळोजी सहकारी संस्था गटातुन प्रदीप अष्टेकर आणि बिगर ऊस उत्पादक वर्गातून भरत शानभाग हे उमेदवार आहेत.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडी अध्यक्ष ऍ. शाम पाटील यांनी प्रास्ताविक केले तर माजी जि.पं.उपाध्यक्ष अरुण कटांबळे व माजी मार्कंडेय शुगर अध्यक्ष व पॅनेलचे प्रमुख अविनाश पोतदार यांनी मनोगत व्यक्त केले. नंतर कडोली गावच्या केंद्रभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन बसवंत मायाण्णाचे, माजी ग्रापं अध्यक्ष अण्णु कटांबळे व अविनाश पोतदार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पोतदार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळण्यासाठी पोतदार पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन केले.

नंतर पोतदार पॅनेलने गावातीलच श्री दुरदुंडेश्वर मठाला भेट देऊन स्वामीजींचे आशीर्वाद घेतले. स्वामीजींनी आशिर्वचन देऊन पॅनेलला शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर छत्रु महाराज कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये मान्यवरांची पॅनेलला पाठिंबा व्यक्त करणारी भाषणे झाली.

चेतक कांबळे यांनी सूत्रसंचालन व स्वागत केले मनोहर हुक्केरीकर यांनी आभार मानले. यावेळी कडोली, गुंजेनट्टी, केदनुर, देवगिरी, जाफरवाडी, अलतगा, आंबेवाडी, कंग्राळीसह परिसरातील नेते, मान्यवर, भागधारक मतदार, ग्रामस्थ व समर्थक संख्येने उपस्थित होते.

Tags: