बेळगावसह उत्तर कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील खाद्यप्रेमींना संपूर्ण भारतभरातील विविध राज्य-प्रदेशांच्या स्थानिक वैशिष्ट्यांनी समृद्ध शुद्ध शाकाहारी खाद्यपदार्थांची चव चाखण्याची संधी आता मिळणार आहे. बेळगावातील कॉलेज रोडवरील हॉटेल आदर्श पॅलेसने आपल्या “आंगण” या नव्या रेस्टॉरंटच्या माध्यमातून खाद्यप्रेमींना ही संधी उपलब्ध करून दिली असून आज त्याचे शानदार समारंभात उदघाटन करण्यात आले.

होय, गेल्या 30 वर्षांपासून हरीश गुलबानी यांनी बेळगावमध्ये उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकांना आदर्श पॅलेस हॉटेलद्वारे उत्तम सेवा दिली आहे. त्यासोबतच सचोटीने कापड व्यवसाय करून ग्राहकांना दर्जेदार वस्त्रप्रावरणांची भेट दिली आहे. त्याशिवाय समाजसेवा क्षेत्रातही ते अग्रेसर आहेत. आता त्यांनी आपल्या नव्या “आंगण” या नव्या रेस्टॉरंटच्या माध्यमातून बेळगावसह उत्तर कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील खाद्यप्रेमींना संपूर्ण भारतभरातील विविध राज्यांच्या स्थानिक वैशिष्टयांनी युक्त चविष्ट दर्जेदार प्युअर व्हेज खाद्यपदार्थ चाखण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
हॉटेल आदर्श पॅलेसच्या सभागृहात आज शुक्रवारी बेळगावच्या अपराध व वाहतूक विभागाच्या डीसीपी स्नेहा पी. व्ही. यांच्याहस्ते “आंगण” या नव्या प्युअर व्हेज रेस्टॉरंटचे फीत कापून व दीप प्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी रेस्टॉरंटची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
उदघाटन करून बोलताना डीसीपी स्नेहा पी. व्ही. म्हणाल्या की, हरीश गुलबानी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांना हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देत चांगली सेवा दिली आहे. आता आंगण रेस्टॉरंटच्या माध्यमातून देशभरातील खाद्यपदार्थांचा आनंद लुटण्याची संधी त्यांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. हॉटेल व्यवसाय हा लोकांची सेवा करण्याची संधी देणारा चांगली व्यवसाय आहे. यात ग्राहकांना हसतमुख सेवा देणे आणि सहनशीलता राखण्याला महत्व आहे. हरीश, आदर्श, अश्विनी आणि गुलबानी कुटुंबीयांनी वरमहालक्ष्मी व्रताच्या निमित्ताने या नव्या उपक्रमाला प्रारंभ केला आहे. त्यांना मी शुभेच्छा देते असे त्यांनी सांगितले.
यावेळी आपल्या नव्या उपक्रमाबद्दल माहिती देताना संचालक हरीश गुलबानी यांनी सांगितले की, आज आम्ही वरमहालक्ष्मी व्रताच्या निमित्ताने “आंगण” रेस्टॉरंट या नव्या उपक्रमाला प्रारंभ केला आहे. पूर्वीच्या काळी साऊथ इंडियन किंवा पंजाबी तडका अशा खाद्यपदार्थांना मागणी जास्त असायची मात्र आता कालानुरूप विविध राज्यांच्या खाद्यपदार्थांना मागणी वाढत आहे. बेळगावकर खवय्येदेखील आज देश-परदेशात फिरतात. तेथील खाद्यपदार्थ चाखतात.
त्यामुळे त्यांना बेळगावात देखील ते पदार्थ मिळावेत ही इच्छा असते. त्यामुळे सर्व राज्यांची वैशिष्ट्ये असलेले शुद्ध शाकाहारी खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आंगण रेस्टॉरंट सुरु केले आहे. याठिकाणी विविध प्रकारच्या थाळी, सदर्न डिलाईट, पंजाबी तडका, चटपटा चाट, पिझ्झा बर्गर, चायनीज न्युडल्स, आईसक्रीम आणि डेझर्ट्स असे नाना प्रकारचे शाकाहारी खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. विशेष म्हणजे सर्वाना परवडेल अशी अत्यंत माफक दरातील 249 रुपयांत 3 रोटी, 2 प्रकारचे राईस, विविध भाज्या आदींचा समावेश असलेली व्हेज थाळी आम्ही उपलब्ध करून दिली आहे. त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
आदर्श पॅलेस आंगणचे अन्य एक संचालक आदर्श गुलबानी यांनी सांगितले की, आजकाल शाकाहारी पदार्थाना मागणी वाढत आहे. त्याशिवाय फास्ट फूडचे प्रेमीदेखील आहेत. कुटुंबासमवेत शाकाहारी जेवणाचा आनंद घेण्याचा लोकांचा कल वाढत आहे. त्यादृष्टीने नियोजन करून आम्ही हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट सुरु केले आहे. येथे आम्ही 24X7 सेवा देऊ. त्याशिवाय पार्सल सेवाही उपलब्ध असेल. आमच्याकडे भव्य पार्टी हॉलदेखील आहे.
ग्राहकांना तत्पर, मनपसंद सेवा देण्यावर आमचा भर राहिला आहे. तीच परंपरा ‘आंगण’मध्येही सुरु राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी पूनम गुलबानी, अश्विनी गुलबानी यांच्यासह गुलबानी कुटुंबातील सदस्य, निमंत्रित मान्यवर आदी उपस्थित होते.


Recent Comments