protest

पुरेशा वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचा हेस्कॉम कार्यालयाला घेराव

Share

पुरेशा वीजपुरवठ्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी हेस्कॉम कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केले.
विजयपूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी तालुक्यातील उक्कली गावात वेळेवर वीज पुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे, असे सांगत शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बसवन बागेवाडी ए.ई.ई., गुरुराज संपण्णवर यांना निवेदन दिले व वेळेवर वीज पुरवठा करण्याची मागणी केली. सहाय्यक कार्यकारी अभियंता गुरुराज संपण्णवर आश्वासन दिले की भविष्यात शेतकर्यांना विजेची कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

यावेळी शेतकरी बाळू मसळी, अंभाजी शिंदे, अशोक इंडी, तिप्पण्णा ब्याकोड , अशोक हविनाळ , अप्पुगौडा बिरादार , शेट्टेप्पा अप्पनगोळ , बिलाल भगवान, विश्वनाथ तडलगी, हुसेन बाशा मकानंदार , सुरेश इटंगीहाळ, कासप्पा सिंदगी आदी शेतकरी उपस्थित होते.

Tags: