बेळगावातील सदाशिवनगर परिसरात कचऱ्याची उचल आणि गटारींची सफाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ रहिवाशांनी आज रस्त्यावर कचरा जमवून रास्ता रोको करून निषेध केला.
बेळगाव शहराचा एक महत्वाचा भाग असलेल्या सदशिवनगरातील कन्नड शाळा परिसरात गटारींची सफाई आणि रस्त्यावरील कचऱ्याची सफाई व उचल केली जात नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. याबाबत महापालिकेला, संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार कळवून देखील त्याची दखल घेतली जात आहि. याच्या निषेधार्थ रहिवाशांनी आज झाडे-झुडूपे, कचरा रस्त्यावर ठेवून रास्ता रोको केला.
यासंदर्भात इन न्यूजला माहिती देताना माजी नगरसेविका व सामाजिक कार्यकर्त्या सरला हेरेकर यांनी सांगितले की, या भागात स्वचछता राखण्यासाठी अनेकदा महापालिकेला विनंती केली आहे. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. गटारींची सफाई व कचऱ्याची उचल केली जात नसल्याने येथे रोगराईचा धोका वाढला आहे.

लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाशी खेळणे बंद करून मनपाने तातडीने येथे सफाई करावी अन्यथा मनपाच्या दारात आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांसमोर कचरा टाकून आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

यावेळी सदशिवनगरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments