Mysore

गृहलक्ष्मी प्रकल्पाच्या उदघाटनासंदर्भात विडिओ  कॉन्फरन्स

Share

उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी गुरुवारी म्हैसूरमध्ये 30 ऑगस्ट रोजी राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘गृहलक्ष्मी’ प्रकल्पाच्या उदघाटन समारंभाची पूर्वबैठक घेतली .

म्हैसूर येथील जिल्हा पंचायत सभागृहातून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी , जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. महिला व बालकल्याण विभागाच्या कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, म्हैसूर जिल्ह्याचे प्रभारी मंत्री एच.सी. महादेवप्पा, चामराजनगर जिल्ह्याचे प्रभारी मंत्री के. व्यंकटेश, मंड्या जिल्ह्याचे प्रभारी मंत्री चलुवरायस्वामी, आमदार तन्वीर सेठ, नरेंद्र स्वामी, अनिल चिक्कमठ , डी. रविशंकर, हरीश गौडा, दर्शन ध्रुव नारायण आणि महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी. बैठकीत उपस्थित होते.

Tags: