नियती को-ॲापरेटिव्ह सोसायटीची निवडणुक प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यामध्ये डॉ. सोनाली सरनोबत व श्री. भरत राठोड यांची अनुक्रमे चेअरपर्सन व व्हाईस चेअरमन म्हणून सर्व सदस्यानुमते निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
नियती सोसायटीची स्थापना कोरोना काळात करण्यात आली. डॉ. सोनाली सरनोबत यांच्या पुढाकाराने या सोसायटीची स्थापना करण्यात आली. बेळगांव चेंबर ॲाफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष रोहन जुवळी यांनी चेअरमन व प्रख्यात डॅाक्टर डॉ. समीर सरनोबत यांनी व्हाईस चेअरमन म्हणून धुरा सांभाळली व अल्पावधीतच सोसायटी नफ्यात आणली. प्रख्यात बिल्डर अनुप जवळकर, उद्योगपती रोहीत देशपांडे, ऍड. भास्कर पाटील,
उद्योगपती प्रकाश मुगळी, कर सल्लागार नरसिंह जोशी, उद्योजक गजानन रामनकट्टी, उद्योजक प्रसाद घाडी, उद्योजक भुषण रेवणकर, उद्योजिका सौ. सुनीता पवार, उद्योजिका सौ वरदा हप्पळी, महिला मंडळ समन्वयक सौ. मंजुळा हेगडे यांची संचालक म्हणून निवड झाली आहे. चीफ मॅनेजर सौ अनुषा जोशी व सौ. दीपा प्रभुदेसाई उपस्थीत होत्या.
सल्लागार म्हणून माजी महापौर विजय मोरे, कर सल्लागार संदीप खन्नुकर, सविता कांबळे, नागरत्ना रामगोंडा, किशोर काकडे, मिलींद पाटील, शितल चिलमी यांनी काम पाहीले.
सोसायटीच्या दोन शाखा आहेत. प्रमुख शाखा पी. एन. गाडगीळ गोल्ड शोरूमच्या ईमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर असुन दुसरी शाखा फुलबाग गल्लीत आहे. तिसरी शाखा खानापुरात लवकरच सुरू होत आहे.


Recent Comments