कावेरीप्रश्नी राज्य सरकारने काय केले हे कोणालाही माहित नाही, विरोधी पक्षांच्या मागणीमुळे राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केली.
सर्व पक्षीय बैठकीला जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले की, राज्य सरकारने काय केले हे कोणालाच माहिती नाही. गेल्या 4 वर्षात चांगला पाऊस झाला, त्यामुळे पीकपाणी चांगले आहे हे विसरून कसे चालेल?. आता पाऊस कमी झाल्यानंतर पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
विरोधी पक्षांच्या मागणीवरून सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे, राज्यातील जनतेच्या हितासाठी सरकारने जो काही निर्णय घेतला आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे, असे ते म्हणाले.


Recent Comments