बदलत्या कालानुरूप रोजगाराच्या अनेक संधी कॉमर्सच्या विध्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत. कठोर मेहनत घेऊन त्या संधींचा लाभ घ्यावा असे आवाहन बेळगाव विभागाचे माजी प्रदेशीय आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी केले.
बेळगावात केएलएस संस्थेच्या गोगटे कॉमर्स कॉलेजमध्ये आज प्रतिभा पुरस्कार-2023 वितरण समारंभ पार पडला. प्रमुख पाहुणे या नात्याने त्याचे उदघाटन करून बोलताना बेळगाव विभागाचे माजी प्रदेशीय आयुक्त एम. जी. हिरेमठ म्हणाले की, देशात आधी जागतिकीकरण आणि नंतर जीएसटी करप्रणाली लागू केल्यानंतर चार्टर्ड अकॉउंटंट, टॅक्स कन्सल्टंट, कंपनी सेक्रेटरी, कंपनी सीईओ आदी अनेक प्रकारचे रोजगार कॉमर्स शाखेच्या विध्यार्थ्यांना उपलब्ध झाले आहेत.
या संधींचा लाभ घेण्यासाठी कॉमर्स विध्यार्थ्यानी अभ्यासात कठोर मेहनत घेऊन यश मिळवावे असा सल्ला दिला. पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ते म्हणाले की, केवळ पुरस्कार मिळाला की संपले असे न समजता, ही खरी सुरवात असल्याचे समजून विध्यार्थ्यानी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोणी कितीही टीका केली, नावे ठेवली तरीही अभ्यास करून जीवनात यशस्वी व्हा असा कानमंत्र हिरेमठ यांनी दिला.
प्रारंभी हिरेमठ व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने समारंभाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी गोगटे कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य एच. एच. विरापूर, डॉ. सविता निडसोशी, प्रा. ए. आर. निरलकेरी, डॉ. दत्ता कामकर आदी उपस्थित होते.
Recent Comments