Belagavi

जिल्हास्तरीय फुटबॉल आणि बॉक्सिंग स्पर्धेचे उदघाटन

Share

जिल्हास्तरीय फुटबॉल आणि बॉक्सिंग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सोमवारी सकाळी सेंट पॉल पीयू कॉलेज कॅम्पसमध्ये पार पडला.
स्पर्धेचे उद्घाटन डीडीपीयूचे प्रभारी प्रो बी वाय हन्नूर यांनी केकले .

यावेळी त्यांनी सहभागी संस्थांना स्पर्धेदरम्यान क्रीडा भावनेचे पालन करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकार लुईस रॉड्रिग्ज हे सन्माननीय अतिथी होते.

महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सनी सादर केलेल्या गार्ड ऑफ ऑनरने उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

डीडीपीयूचे प्राध्यापक हन्नूर यांनी सेंट पॉल पीयू कॉलेजने व्यावसायिकरित्या केलेल्या निर्दोष व्यवस्थेचे कौतुक केले. “अल्प कालावधीत अशा विस्तृत व्यवस्थेचा मी पहिल्यांदाच अनुभव घेत आहे,” असे ते म्हणाले .

सेंट पॉल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संचालक सायमन फर्नांडिस, पीयू कॉलेजचे संचालक स्टीव्हन आल्मेडा, कॉलेजच्या प्राचार्या डॉ. पद्मिनी रवींद्रन, बेळगावचे उप तहसीलदार पी संतोष, पीयू विभागाचे समन्वयक श्रीधर हिरेमठ हेही उपस्थित होते.

बॉक्सिंग प्रशिक्षक व मार्गदर्शक विश्वनाथ चरणीमठ, शारीरिक शिक्षण प्रशिक्षक जॉन डालमेट, विजय रेडेकर, दिनेश पाडकी आणि संघ स्पर्धेचे संयोजन करत आहेत. मंगळवारी पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

अमृता तानवडे या समारंभाच्या सूत्रधार होत्या. रुतिका निलजकर यांनी स्वागत नृत्य सादर केले तर महाविद्यालयीन मंत्रिमंडळ आणि स्वयंसेवकांनी पॉवर पॅक्ड नृत्य केले.

Tags: