शांताई वृद्धाश्रमाचा २५ वा वर्धापन दिन बेळगाव येथील निराश्रीत परिहार केंद्र (भिकारी पुनर्वसन केंद्र) मध्ये साजरा करण्यात आला. यंदा शांताई वृद्धाश्रमाला डिसेंबरमध्ये २५ वे वर्ष पूर्ण होत असल्याने दर महिन्याला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
निराश्रित पुनर्वसन केंद्र 150 लोकांची काळजी घेत आहे, आणि कर्मचारी उत्कृष्ट काम करत आहेत, या प्रसंगी कर्मचारी व अधीक्षक मल्लेशप्पा मेगडी यांचा सत्कार बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी , बेळगाव महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी संजय डुमगोळ यांच्या हस्ते करण्यात आला. यंग बेळगाव फाउंडेशनचे अध्यक्ष अॅलन विजय मोरे, प्रभाकर नागरमुनोळी , अद्वैत चव्हाण पाटील, मारिया मोरे, नागेश बोभाटे कंत्राटदार मंजुनाथ व इतर मान्यवर उपस्थित होते .
बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केंद्र आणि शांताई वृद्धाश्रमाचे समाजाप्रती असलेल्या समर्पणाबद्दल कौतुक केले आणि आपण संस्थांना थेट मदत केली पाहिजे आणि त्यांना सहकार्य करावे असेही सांगितले. महापालिकेच्या वतीने जी काही मदत लागेल ती द्यायला तयार असल्याचे सांगून सर्वांचे कौतुक केले
माजी महापौर विजय मोरे यांनी संपूर्ण बेळगावात समर्पित सेवा केल्याबद्दल कॉर्पोरेशन आयुक्तांनी त्यांचे विशेष कौतुक केले आणि त्यांचा गौरव केला.

यावेळी बेळगाव शहराचे माजी महापौर विजय मोरे यांनी आयुक्त अशोक दुडगुंटी बेळगाव शहरात करत असलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन केले .आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मोरे यांनी केले तसेच आयुक्त अशोक दुडगुंडी यांचेही कौतुक व सत्कार केला.
खानापूरच्या लोककला संस्थेचे प्रमुख गजानन दरेकर व नागेश बोबटे यांनी सुमारे तासभर भारुड भजने व भक्तिगीते गायन करून व विठ्ठलाची गाणी गाऊन वातावरण मंत्रमुग्ध केले तर आश्रम व शांताई वृद्धाश्रमातील रहिवासी मंत्रमुद्घ झाले होते. उपस्थित सर्वांनी नृत्य सादर केले आणि नंतर राजेश्री रायबागी आणि महावीर रायबागी यांनी पूजा केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज गवळी, संतोष ममदापूर, संजय वालावलकर, नागेश बोंबाटे मारिया मोरे, चेरिल मोरे, संदीप सोमनट्टी लकी सोलंकी, प्रणव बेळगावकर, ओंकार बैलुरकर आणि यंग बेळगाव टीम सदस्यांनीही खूप मेहनत घेतली.
अॅलन विजय यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मान्यवरांचे आणि सर्व मित्रांचे मनापासून आभार मानले.


Recent Comments