Accident

बसच्या धडकेने जनरल थिम्मय्या यांचा कोसळला पुतळा

Share

कोडगू शहराच्या मध्यभागी असलेला जनरल थिम्मय्या यांचा पुतळा केएसआरटीसी बसच्या धडकेने कोसळला.

आगारातून बसस्थानकाकडे जाणार्या बसने पिकअप वाहनाची धडक टाळण्याचा प्रयत्न करत जनरल थिम्मय्या सर्कलजवळ धडक दिली . ही घटना सोमवारी पहाटे घडल्याचे सांगण्यात येत आहे.

बसच्या धडकेमुळे थिम्मय्या यांचा पुतळा खाली पडला आणि बस चालक व वाहक किरकोळ जखमी झाले आहेत . . थिम्मय्या यांचा पुतळा थिम्मय्या मेमोरियल हॉलच्या आवारात हलवण्यात आला आहे.

Tags: