वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाविरोधात बेळगावात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक नियम उल्लंघनाबद्दल 16 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
बेळगावातील क्लब रोड, गांधी चौक व अन्य ठिकाणी वाहतूक पोलिसांनी नियम उल्लंघन करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांवर कारवाई करत दंड आकारला. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकाचे निरीक्षक विनायक बडिगेर व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. या वाहनचालकांकडून दंड आकारून,
सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले. हेल्मेट न घालणे, कर्णकर्कश हॉर्न व सायलेन्सर वापरणे, आरसे नसणे, कागदपत्रे व्यवस्थित नसणे, इन्शुरन्स नसणे आदी गुन्ह्यांखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.


Recent Comments