Belagavi

शेफ कल्लाप्पा भातकांडे यांनी कलिंगडात साकारली शिवप्रतिमा

Share

सण-उत्सवांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण मासाला आणि त्यातही श्रावण सोमवारला हिंदू संस्कृतीत खूप महत्व आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावचे शेफ कल्लाप्पा शिवाजी भातकांडे यांनी कलिंगडामध्ये शंकर आणि शिवलिंग साकारले आहे.

होय, उद्या यावर्षीच्या पवित्र श्रावणातील पहिला सोमवार आहे. त्यामुळे शहरात शिवमंदिरांमध्ये भोळ्या शंकराच्या पूजेची जय्यत तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शेफ कल्लाप्पा भातकांडे यांनी अनोख्या पद्धतीने आपली शिवभक्ती प्रकट केली आहे. त्यांनी चक्क कलिंगडामध्ये भगवान शिवशंकराची आणि शिवलिंगाची सुबक कलाकृती साकारली आहे. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त त्यांनी साकारलेल्या या कलाकृतीचे भोलेनाथाच्या भक्तांनी कौतुक केले आहे.

 

Tags: