तमिळनाडूला पाणी सोडण्यास स्वपक्षियांच्या विरोधावर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी भाष्य केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. पाणी सोडण्याच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवू असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले की, पाणी सोडण्याबाबतचा कायदा घटनेत आहे. शेतकऱ्यांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. राज्यात पिण्यासाठी पाणी नाही. शेतीसाठी पाणी नाही. आम्ही पाणी सोडले आहे. सरकारला समतोल राखावा लागतो.
आम्ही बोर्डाला पत्र लिहिले आहे. प्रतिदिन दहा हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचा आदेश असला तरी सध्या पिण्यासाठी पाणी नाही, शेतीसाठी तर पाणी नाहीच नाही अशी परिस्थिती आहे. आधीच्या सरकारने किती पाणी सोडले याची यादी मी जाहीर करणार नाही. पाणीप्रश्नी आम्ही सर्वपक्षीय बैठक नक्कीच घेऊ. राज्याच्या सर्व प्रश्नांबाबत सर्वपक्षीय बैठका घेऊ.
खात्याने मंदिर जीर्णोद्धाराचे पैसे रोखले, याबाबत मला माहिती नाही. मंत्री रामलिंग रेड्डी यांनाच याबाबत विचारा असे डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे.


Recent Comments