विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील हडलगेरी रोडजवळील पद्मावती मंदिरा
जवळील बांधकाम सुरू असलेल्या सांडपाणी विकास मंडळाच्या घरात एक मजूर संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आला.
अमजद हाजीसाब वालीकार (५२) रहाणार विजयपूर असे मृताचे नाव आहे, तो घराच्या बांधकामासाठी सेंटरिंग मेस्त्री होता . मृताच्या पाठीमागून शरीराच्या मागील बाजूस रक्ताचा साठा आढळून त्याच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे .
या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्यासोबत एकाच खोलीत झोपलेल्या तीन कामगारांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. विजयपूर जिल्हा मुख्यालयातून विशेष गुन्हे अन्वेषण पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपास केला. डीवायएसपी करुणाकर शेट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन कायदेशीर कारवाई केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला .
Recent Comments