Dharwad

राष्ट्रीय महामार्गावर गॅस गळती : 18 तासांनंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत

Share

धारवाड उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोरील राष्ट्रीय महामार्गावर काल सायंकाळी अग्निशमन दल आणि पोलिसांनी यशस्वीरित्या गॅस गळती होणारे वाहन हटवले असून तब्बल १८ तासांनंतर त्या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.

गॅस सिलिंडरचे वाहन पुलावरून जात असताना पुलावर आदळले आणि गॅस गळती झाली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या रस्त्यावरील वाहनांना बंदी घातली.

रात्री ही कारवाई करून दुसऱ्या वाहनात गॅस भरण्याचे काम करण्यात आले. कोणताही अनर्थ घडू नये म्हणून गॅस गळती होत असल्याने वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. रात्रभर रस्त्यावर वाहने उभी होती. आता त्यांनी गॅस टँकर तिथून हटवण्यात आला असून , या रस्त्यावरून वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे .

Tags: