पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वखालील केंद्र सरकारने ९ वर्षे पूर्ण केली आहेत . या नऊ वर्षात ह्या सरकारने , जनतेच्या हितासाठी जारी केलेल्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन खा . मंगला अंगडी यांनी केले .
केंद्रीय दळणवळ विभाग धारवाड , (माहिती व प्रसारण मंत्रालय ), सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन धरवड तसेच , बेळगाव जिल्हा प्रशासन , जिल्हा पंचायत , माहिती व जनसंपर्क विभाग , कृषी विभाग , महिला व बालविकास विभाग , आणि युवा सक्षमीकरण व क्रीडा विभाग बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने , स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच केंद्र सरकारची ९ वर्षे सेवा , सुशासन , गरीब कल्याण योजना , पंतप्रधान प्रणाम योजना , एक भारत श्रेष्ठ भारत बेळगाव जिल्ह्यातील जनतेला केंद्र सरकारी योजना तसेच सरकारचे सुशासन तसेच जनतेला द्यावयाच्या सुविधा याविषयी विशेष छायाचित्र प्रदर्शन , आयोजन करण्यात आले होते .
बेळगावमधील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेत आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन , खासदार मंगला अंगडी तसेच राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी आणि उपस्थित मान्यवरांनी यांनी उदघाटन केले .
यानंतर त्यांनी विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे निरीक्षण केले .
यावेळी बोलताना खा. मंगला अंगडी पुढे म्हणाल्या कि , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने यशस्वी रित्या पूर्ण केली आहेत . सर्वच क्षेत्रांसाठी ह्या सरकारने कल्याणकारी योजना राबवल्या आहेत .
शिक्षण , कृषी , तंत्रज्ञान , आरोग्य , त्याचप्रमाणे तळागाळातील जनतेसाठी उपयुक्त अशा योजना या सरकारने दिल्या आहेत . त्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केली .
यावेळी खा . इराण्णा कडाडी म्हणाले कि , माणूस कुठल्याही देशात जन्माला आला तरी त्याला त्या देशाचा नागरिक म्हणून , मूलभूत हक्क पुरवणे हा हे तिथल्या सरकारचे कर्तव्य आहे . आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने , आरोग्य , कृषी , शिक्षण , संरक्षण , घरोघरी नळपाणी योजना , स्वच्छ भारत मिशन , कृषी विमा , शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना , तांत्रिक मी क्षेत्रात देखील भरीव योगदान दिले आहे .
याची माहिती जिल्ह्यातील जनतेला मिळावी यासाठी , हे पाच दिवशीय विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . त्याचा लाभ घेऊन , सरकारी योजनांचा देखील लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले .
यावेळी , जिल्हाधिकारी नितेश पाटील , जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर , शिवनगौडा पाटील , एन एन कांबळे , नागराज आर , बी श्रीनिवास , गुरुनाथ कडबूर , बसवराज हट्टीगौडर आदी उपस्थित होते .


Recent Comments