Belagavi

क्रांती महिला मंडळ आणि उमा संगीत प्रतिष्ठान संस्थांतर्फे शंभर सैनिकांचा सन्मान

Share

शहरातील मिरापुर गल्ली येथील चिंतामणी राव हायस्कूलच्या राजलक्ष्मी राजे विजयसिंह राजे पटवर्धन शताब्दी सभेत क्रांती महिला मंडळ आणि उमा संगीत प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांतर्फे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

कर्नल शंकर व्ही यादव, एडीएम अधिकारी बेळगाव यांनी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून भाषण केले आणि स्वत: सैनिक या नात्याने आज इतक्या सैनिकांचा सन्मान करण्याचा बहुमान दिल्याबद्दल आमच्या दोन्ही संस्थांचे आभार मानले आणि आम्ही करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली.

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना , या संस्थांना शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसतानाही ते चांगले काम करत आहेत, आमची संपूर्ण बेळगावची जनता तुमच्या पाठीशी असल्याचे सांगून ते म्हणाले की, आमच्या देशात आजही देशभक्ती ओसंडून वाहत आहे. .

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ते म्हणाले की आमच्या दोन्ही संस्था सुमारे शंभर सैनिकांचा सन्मान करत आहेत ही अभिमानाची बाब आहे.
बेळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर शोभा सोमनाचे आणि नगरसेवक नितीन जाधव यांनी सर्व सैनिकांचा सन्मान करण्यात आला

. भारतमातेच्या प्रतिमेला मान्यवरांकडून पुष्पांजली अर्पण करून आणि क्रांती महिला मंडळाच्या सदस्या आणि उमा संगीत प्रतिष्ठानच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते व नृत्यांसह ‘कन्फ्युज्ड इंडियन विथ देशभक्ती’ या लघुपटाचे प्रकाशन केले. आर्ष आश्रमाच्या मुलांनी स्वागत केले.कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्षा मंगल मठद यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव रेणुका कांबळे यांनी केले.कार्यक्रमात आर्ष विद्याश्रमच्या मुलांना कपडे वाटप करण्यात आले.

Tags: