police

अवैधरित्या देशी पिस्तुल बाळगणाऱ्यास अटक

Share

इंडी येथे अवैधरित्या देशी पिस्तुल बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी छापा टाकून देशी पिस्तुल व जिवंत काडतुसे जप्त केली.

विजयपूर जिल्ह्यातील इंडी शहरातील रेल्वे स्टेशनजवळ अवैधरित्या देशी पिस्तुल बाळगणाऱ्या एकाला अटक करून पिस्तूल व काडतुसे जप्त केली. लच्चान गावातील अनिल मल्लाप्पा भंडारी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याने पिस्तूल बाळगल्याच्या माहिती मिळाल्याच्या आधारे पाळत ठेवून इंडी शहरातील रेल्वे स्थानकाजवळ शौचास जात असताना पीएसआय सोमेश गेज्जी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकून त्याच्याकडून एक देशी पिस्तुल व दोन जिवंत गोळ्या जप्त करण्यात आल्या.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध इंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: