Banglore

विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून तीन उमेदवार निश्चित

Share

विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून तीन उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. काँग्रेस पक्षातील काही नेत्यांच्या विरोधाला न जुमानता उमाश्री, एम. आर. सीताराम, सुधाम दास यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसमधून विरोध असतानाही उमाश्री, एम.आर. सीताराम आणि सुधाम दास यांची नावे विधान परिषदेसाठी नामनिर्देशित करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तिघांची नावे निश्चित केली असून, मंजुरीसाठी राज्यपालांना यादी पाठवली आहे.

माजी मंत्री आणि अभिनेत्री उमाश्री यांना कलाकार कोट्यातून, एमआर सीताराम यांना शैक्षणिक कोट्यातून आणि सुधाम दास यांना सामाजिक सेवा कोट्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस नेते मन्सूर अली खान यांचे नाव अंतिम यादीतून वगळण्यात आले.

सीताराम आणि सुधाम दास यांच्या निवडीला काँग्रेसमध्ये विरोध असल्याने काही इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांच्याशी संपर्क साधून इच्छुकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Tags: