Belagavi

पत्नी, आईच्या मृत्यूने अस्वस्थ झालेल्या दोघांची आत्महत्या

Share

आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर होणार विरह किती असह्य असतो याची प्रचिती देणारी दुर्दैवी घटना बेळगावात आज उघडकीस आली आहे. शहरातील कपिलेश्वर तलावात आढळलेल्या एका वृद्धाच्या आणि एका वृद्ध महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून जवळच्या व्यक्तींच्या मृत्यूने अस्वस्थ होऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

बेळगावातील कपिलेश्वर तलावात आज सकाळी दोन मृतदेह आढळून आले असून, दोन्ही मृतदेहांची ओळख पटली आहे. दोन्ही मृतदेह वेगळे असले तरी त्यांच्या मृत्यूचे कारण एकच आहे.
पत्नीच्या मृत्यूने दु:खी झालेल्या पतीने तलावात उडी घेऊन जीव दिला, तर आईच्या मृत्यूने दुखावलेल्या मुलीनेही याच तलावात उडी घेऊन जीव दिला. आज सकाळी दोघांचेही मृतदेह एकाच तलावात सापडले. प्रेमाची
ही नाती म्हणजे खूप महत्वाची असतात. ही नाती अकाली तुटली तर पायाखालची जमीनच सरकते आणि माणूस टोकाचा निर्णय घेऊन बसतो.

आई गमावलेल्या मुलीने कपिलेश्वर तलावात उडी मारून दिला जीव !!

बायको गमावलेल्या नवऱ्यानेही त्याच तलावात उडी घेत संपवले जीवन !!

योगायोगाने दोन्ही मृतदेह एकाच वेळी सापडले!!

मंदिरांमध्ये रोजच भाविकांची ये-जा करणे आणि पूजाविधी करणे हे सामान्य आहे, मात्र बेळगावच्या कपिलेश्वर मंदिरात आलेल्या भाविकांना आज चांगलाच धक्का बसला. कपिलेश्वर मंदिरामागील तलावात दोन मृतदेह तरंगताना आढळले. दोघांनी एकत्र आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी वाटत होते, मात्र दोघांचाही वेगवेगळ्या कारणाने मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. आईच्या निधनामुळे नैराश्य आणि मानसिक आजारी असलेल्या चित्रलेखा सराफ हिने नैराश्येला कंटाळून आईच्या आठवणीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांना तिच्या मृत्यूचे कारण सांगितले.

बेळगावातील कांगले गल्ली येथील रहिवासी असलेले विजय पवार हे त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते. दोन वर्षांपूर्वी विजयच्या पत्नीचे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. काल रात्री घरून निघालेला विजय सकाळी कपिलेश्वर खड्ड्यात मृतावस्थेत आढळून आला. मृत विजय पवार यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
एकंदरीत, आई-बायकोच्या नात्यापासून दुरावलेल्या दोन जीवांनी त्यांच्या विरहाला कंटाळून जीव दिला, ही खरोखरच शोकांतिका आहे, पण आता त्यांच्या आठवणीने कुटुंब शोक करीत आहे.

Tags: