police

ग्रामपंचायतींना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज : लक्ष्मी हेब्बाळकर

Share

खेड्यांची सुधारणा ग्रामपंचायतींच्या माध्यमातूनच शक्य आहे, त्यामुळे ग्रामपंचायतींना अधिक अधिकार दिले पाहिजेत, असे मत महिला व बालविकास, अपंग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण खात्याच्या व उडुपी जिल्ह्याच्या पालक मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.

कुंदापूर तालुक्यातील हार्दळ्ळी-मांदळ्ळी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते झाले. त्यानंतर बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, महात्मा गांधी यांनी,

देशाचा विकास हा गावांच्या विकासातून होतो. ग्रामपंचायतींना आवश्यक मूलभूत सुविधा देऊन सक्षम केल्यास गावांचा विकास शक्य होईल, असे म्हटले होते. उडुपी जिल्ह्याच्या विकासाबाबत सर्व आमदारांशी चर्चा करून योजना

राबविण्यात येणार आहेत. सरकारने राबविलेल्या 5 हमी योजनांचा जिल्ह्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंदापूरचे आमदार किरणकुमार कोडगी होते. यावेळी विधान परिषद सदस्य कोटा श्रीनिवास पुजारी, जिल्हाधिकारी डॉ.के.विद्याकुमारी, जिल्हा पोलीस अधीक्षक अक्षय होके, जिल्हा पंचायत सीईओ प्रसन्ना एच., कुंदापूर प्रांताधिकारी रश्मी, तहसीलदार शुभलक्ष्मी, कार्य व्यवस्थापन अधिकारी भारती आदी उपस्थित होते.

त्याच प्रसंगी मंत्री महोदयांनी भायंदूर येथे नुकत्याच झालेल्या मासेमारी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सतीश खारवी यांच्या कुटुंबीयांना मत्स्यव्यवसाय विभागाकडून नुकसानभरपाईचा धनादेश प्रदान केला.

Tags: