Belagavi

नागरगाळीच्या वन अधिकाऱ्यांनी सागवान लाकडासह रानडुकराचे मांस केले जप्त

Share

बेळगावचे वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण आणि उप वनसंरक्षक एस.के.कल्लोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नागरगळीचे सहाय्यक वनसंरक्षक एम.बी.कुसना यांच्या मार्गदर्शनाखाली नागरगाळी झोन वनअधिकारी रत्नाकर ओबनवर यांच्या मार्गदर्शनाखाली काही माहितीच्या आधारे गौवळीवाड येथील गंगाराम डावू बोडके यांच्या घरावर छापा टाकला ,

घरावर छापा टाकून तपासणी केली असता 6 सागवानी लाकडाचे नग (7.088 घनफूट) आणि 500 ग्रॅम उकडलेले रानडुकराचे मांस जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याच वेळी,

ज्ञानेश्वर बम्मू वरका यांच्या घरावरही छापा टाकून सागवान लाकडाच्या ७१ पट्ट्या जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आल्या .या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत बांगी, गस्ती वनरक्षक प्रधान सिंघे, पुंडलीक लाड, लक्ष्मण देवरकोंड आदींचा सहभाग होता.

Tags: