धारवाड येथील लिंगायत भवनात मंत्री ईश्वर खंडरे यांचा लिंगायत महासभेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
सन्मान स्वीकारून बोलताना मंत्री ईश्वर खंडरे म्हणाले की, आपला परिवार समाजाच्या संघटनेत सतत सहभागी असतो. लिंगायत समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सर्वांना सामावून घेणारा आणि सर्वांना समानतेची शिकवण देणारा एकमेव समाज म्हणजे लिंगायत समाज होय . लिंगायत मठमान्यांच्या माध्यमातून त्यांनी समाजात ज्ञान, संस्कृती आणि शांतता यासाठी जागृती निर्माण करण्याचे काम केले आहे.
यावेळी लिंगायत महासभा धारवाडचे जिल्हाध्यक्ष गुरुराज हुनसीमरद , बनजिग संघाचे जिल्हाध्यक्ष शेखर कवळी, समाजाचे जेष्ठ एम एफ हिरेमठ, अरुण सिलवंत, शरणप्पा कोटगी, शिवानंद कवळी, अशोक शेट्टर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments