Belagavi

सेंट पॉल स्कूल द्वारे रक्तदान जनजागृती रॅली

Share

सेंट पॉल स्कूल द्वारे रक्तदान करण्यासंदर्भात जनजागृती रॅली काढली रक्तदान करा आणि जीव वाचवा, रक्तदान श्रेष्ठ दान, आम्ही सर्व भारतीय’ या घोषवाक्याने ही जनजागृती रॅली काढण्यात आली .

शहरातील कॅम्प भागातील सेंट पॉल स्कूल पासून ह्या रॅलीची सुरुवात करण्यात आली . कॅम्प पोलिस स्टेशन तसेच कॅम्प परिसरात रक्तदानाची जनजागृती या रॅलीद्वारे करण्यात आली .

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी , रक्तदानाचे महत्व समजून सांगण्यासाठी आमच्या शाळेच्या वतीने ही जनजागृती रॅली काडली असायचे सांगितले . या जनजागृती रॅलीत एनसीसीच्या विद्याथी सहभागी झाले आहेत . रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे . रक्तदान केल्याने आपण एखद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो . असे ते म्हणाले .

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक , पालक , विद्यार्थी ,एनसीसी विद्यार्थी उपस्थित होते

Tags: