लाखो रुपये खर्च करून बेळगाव रेल्वे स्थानकासमोर उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं असून बस स्थानक नेमकं प्रवाशांसाठी आहे, की जनावरांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे . त्यामुळे सध्या बेळगाव सारख्या स्मार्ट सीटीत वंदे भारत सारख्या वातानुकूलीत एक्सप्रेसची चर्चा असताना. याच रेल्वे स्थानकासमोरील बसस्थानकाची मात्र दुरावस्था झाल्याने , प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लाखो रुपये खर्च करून आणि खूप गाजावाजा करून बेळगावच्या रेल्वे स्थानकासमोर गोवा बस स्थानकाची उभारणी करण्यात आली. येथून गोवा आणि कारवारसाठी नियमित बस जातात. यातtन दररोज शेकडो प्रवाशी प्रवास करतात. मात्र सध्या हे बसस्थानक म्हणजे जनावरांचा गोठा असल्याचा अनुभव येत आहे. माfहलांसाठी आणि तिकीटासाठी उभारण्यात आलेले कक्ष सध्या बंद असून या कक्षांसमोर दिवस रात्र जनावरे बसलेली दिसून येतात.
त्यामुळे हा परिसर जनावरांच्या शेणाने माखला आहे. त्यातच मावा खाऊन जागोजागी थुंकल्याने , भिंती आणि कोपरे रंगले आहेत. प्रवाशांसाच्या आसन व्यवस्थेसाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्या अक्षरश: तुटून पडल्या आहेत. त्यातच निराधार व्यक्तीसाठी हे बस स्थानक निवार्याचं केंद्र बनले आहे .
दरम्यान येथून प्रवास करणार्या प्रवाशांना या घाणीतच बसची वाट पाहावी लागत आहे . प्रवाशांसाठी बसस्थानकात ज्या सुविधा राहायला हव्यात त्याचा इथे कुठेच मागमूस दिसत नाही .
दरम्यान या बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून गाळेही बनवण्यात आले आहेत. पोलीस चौकी उभारण्यातआली आहे . .मात्र हे सर्व सध्या बंद अवस्थेत आहे. रात्री या बस स्थानकावर काहि गैरप्रकारहि सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
यासंबंधी कारवारहून आलेल्या एका प्रवाशाने या सर्व अव्यवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली .इथली घाण , अस्वच्छता , पाहून इथे बसायला देखील मन होत नाही . संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन , या बसस्थाकात स्वच्छता राखावी असे आवाहन केले
त्याचप्रमाणे सुरेश नामक एका प्रवाशाने देखील इथली अस्वच्छता आणि असुविधा याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली . ह्या बसस्थानाकचे नूतनीकरण केले मात्र याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे . सगळीकडे कचरा आणि घाण आहे . हे बसस्थानक बाहेरून जरी दिसायला चांगले दिसत असले तरी आतून सर्व अस्वच्छ आहे . संबंधित विभागाने स्मार्ट सिटीतील या बसस्थानकाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले .
हे बस स्थानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या रेल्वे स्थानकासमोरच आहे. त्यामुळे बेळगावमधील लोकप्रतिनिधी आणि संबंधीत विभागाचे अधिकारी या बसस्थानकाच्या अवस्थेकडे तातडीने लक्ष देणार का? याची प्रतिक्षा बेळगावकरांना आहे.
देशासाठी काँग्रेसचे योगदान मोठे
देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिन आपण साजरा करणार आहोत . आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी त्याग आणि बलिदान दिले आहे . त्याचप्रमाणे , देशासाठी काँग्रेसचे योगदानदेखील मोठे असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले .
गोकाक येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले कि , आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन , जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे . या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी त्याग केला , बलिदान दिले . त्याचेच फळ आज आम्ही उपभोगत आहोत . देशासाठी काँग्रेसचे योगदान देखील मोठे आहे असे ते म्हणाले .
ते म्हणाले कि गृहलक्ष्मी योजनेच्या लोकार्पणाची तारीख औज निश्चित केलेली नाही . मात्र या योजनेचे लोकार्पण बेळगावमध्ये आहे . अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली .


Recent Comments