Belagavi

पंपसेट चोरणाऱ्या टोळके गजाआड; 14 पंपसेट, 2 दुचाकी जप्त

Share

गोकाक तालुक्यातील कुलगोड ठाण्याच्या पोलिसांनी पंपसेट चोरणाऱ्या टोळक्याला गजाआड करण्यात यश मिळवले आहे.
कुलगोड पोलिसांनी

पंपसेट चोरणाऱ्या 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीचे दोन लाख तीन हजार रुपये किमतीचे 14 पंपसेट आणि दोन दुचाकी जप्त केल्या.

पंपसेट चोरी करणाऱ्या आरोपींची नावे अशी : कुमार रमेश कंबारा, वय 21 वर्षे, यल्लप्पा मुदकप्पा नंदी, वय 35 वर्षे, रवी अजित कंबार, वय 21 वर्षे, भीमप्पा होळेप्पा मनमसागर, वय: 27 वर्षे. हे सर्व आरोपी कैतनाळ गावचे आहेत. कुलगोड पीएसआय यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

Tags: