Accident

हेस्कॉमच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने खांबावरच मृत्यू

Share

हेस्कॉमच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून खांबावरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरातील होस्पेट गल्ली येथे घडली.
सिध्दराम कुपवडे वय 38 असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या हेस्कॉमच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. मृत सिद्धराम कुपवडे हे चिक्कोडी शहरातील दफेदारकोडी भागातील रहिवासी होते. ते होस्पेट गल्लीतील शेतजमिनीजवळील विद्युत खांबाच्या दुरुस्तीसाठी वीजखांबावर चढले होते. खाली दोन कर्मचारी होते. त्यावेळी अचानक वीज पुरवठा सुरु झाल्याने विजेचा जोराचा धक्का बसून त्यांचा खांबावरच मृत्यू झाला. घटनेनंतर सिद्धराम कुपवडे यांचा मृतदेह खांबावरच लटकत होता. हेस्कॉमचे अधिकारी व चिक्कोडी पोलीस घटनास्थळी भेट देऊन तपास करत आहेत. या घटनेने हेस्कॉमच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त करण्यात येतोय.

Tags: