Belagavi

शाळा इमारतींचे चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते भूमिपूजन

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील तुम्मरगुद्दी, सोमनट्टी आणि अरळीकट्टी गावातील शासकीय वरिष्ठ प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी शनिवारी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

पावसामुळे शाळांच्या इमारतींचे नुकसान झाले असून त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी भूमीपूजेनंतर कामांना सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, ग्रामीण मतदारसंघाचा शैक्षणिक विकास करण्यासाठी सर्वसमावेशक योजना आखली जाईल. याबाबत सर्वांचा सल्ला व सहकार्य घेण्यात येईल. उच्च शिक्षण क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संबंधित गावातील ज्येष्ठ शेखर होसुरी, कल्लाप्पा शिंगी, कलमेश मलगढी, शिवशंकर पाटील, शिवाजी तळवार, शेखर शिंगी, नागराज हुंकळी, लक्ष्मण केंपलदिन्नी, बाळाप्पा यद्दलगुड्ड, मंजुनाथ तोटगी, बाळप्पा बसरीमरद, होळेप्पा नंद्यागोळ, बाळप्पा मास्तमर्डी, मल्लेश पुजेरी, टोपण्णा, कल्लाप्पा यद्दलगुड्ड, सन्नरायप्पा, निंगाप्पा बागेवाडी, सिद्दण्णा सिंगाडी, राजू उप्पार, नागराज करलिंगनवर, रमेश तिगडी, गुरप्पा हेब्बाळकर, चंबण्णा उल्लागडी व गट शिक्षणाधिकारी दासप्पगोळ आदी उपस्थित होते.

Tags: