अग्निशामक दलाचे जवान आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एका खुल्या गटारीत पडलेल्या गायीला जीवदान दिल्याची घटना बेळगावात घडली.

बेळगावातील टिळकवाडीतील तिसर्या रेल्वे गेटनजीक मंगेश पेट्रोल पंपाजवळ खुल्या गटारात आज एक गाय पडली होती. त्याची माहिती श्री राम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना मिळाली. याबाबत अग्निशमन दलाला देखील कळविण्यात आले होते. बावा स्वयंसेवी संस्था, श्री राम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्ते, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन गटारीत पडलेल्या गायीची सुखरूप सुटका केली. या कामात नरू निलजकर, आतिश धाटोंबे, शुभम सुतार, अवधूत तुडवेकर, संतोष दरेकर, चेतन कांबळे, अनिल पाटील, अँथनी जेवाकुंतला यांनी भाग घेतला.


Recent Comments