0water problems

पर्यटकांच्या सुरक्षा उपाययोजनांसह गोकाक फॉल्सचा करणार विकास

Share

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज गोकाक फॉल्सला भेट देऊन पाहणी केली.

बेळगाव जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकाक फॉल्सला दरवर्षी 3 ते 4 लाख लोक भेट देतात. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करण्यासाठी गोकाक फॉल्सला भेट दिल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, प्रसिद्ध गोकाक धबधब्याला मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. धबधब्याच्या विकासासाठी करावयाच्या कामांची त्यांनी पर्यटन विभागाकडून माहिती घेतली असून लवकरच गोकाक धबधबा परिसर विकसित करणार असल्याचे सांगितले. ( )

यावेळी युवा नेत्या प्रियांका व युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्यासह स्थानिक नेते व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: