मृत ठेकेदार संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांनी बेळगाव विमानतळावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आणि प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याची विनंती केली.

कर्नाटकात सध्या कंत्राटदार संघटना आणि सरकार यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या संतोष या कंत्राटदाराचे प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. आज संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची बेळगाव विमानतळावर भेट घेतली आणि या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याची विनंती केली.
13 एप्रिल 2022 रोजी संतोष पाटील यांनी माजी मंत्री के एस ईश्वरप्पा यांच्यावर आरोप करत उडुपी येथील एका लॉजमध्ये मृत्यूची चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.
निवेदन स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतां कंत्राटदार संतोष पाटील यांनी सांगितले की, कुटुंबीयांनी दाद मागितली असून आम्ही पोलिस विभागाकडे हे प्रकरण मांडू.
मृत संतोष पाटीलाच्या आईने सांगितले की, माझ्या मुलाने अनेक सरकारी कामांचे कंत्राट घेऊन प्रामाणिकपणे काम केले पण के एस ईश्वरप्पा यांनी त्याच्या जीवाशी खेळ केला . .माझ्या मुलाला जीव गमवावा लागला.येडियुरप्पा हे माझ्या मुलाला आजोबांसारखे होते, मात्र त्यांनी आम्हाला कंत्राट देण्याचे आश्वासन दिले.पण त्यांनी आपला शब्द पळाला नाही असा आरोप केला.
संतोष पाटील यांच्या पत्नीने बोलतांना सांगितले की, आमच्या कुटुंबाने निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केले.त्यांच्या आत्महत्येप्रकरणी बी अहवाल सादर करणे हे अन्यायकारक आहे, त्यामुळे हे प्रकरण सीबीआय किंवा सीआयडीकडे सोपवावे, अशी मागणी आम्ही केली आहे.
सध्या, आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल आणि या याचिकेवर विचार करून सरकार हे प्रकरण पुन्हा उघडेल आणि तपासासाठी सीबीआय किंवा सीआयडीकडे सोपवेल का.


Recent Comments