Belagavi

जालगार गल्लीतील श्री कालिकादेवी मंदिरात कुंकुमार्चन सोहळा

Share

सकल मनोकामना पूर्ण होण्याच्या हेतूने बेळगावातील जालगार गल्लीतील श्री कालिकादेवी मंदिरात दैवज्ञ ब्राह्मण समाज महिला मंडळातर्फे आज अधिक मासानिमित्त देवीचा कुंकुमार्चन सोहळा विधिपूर्वक पार पडला.

दैवज्ञ ब्राह्मण समाज महिला मंडळातर्फे दरवर्षी श्रावण मासात जालगार गल्लीतील श्री कालिकादेवी मंदिरात देवीचा कुंकुमार्चन सोहळा विधिपूर्वक आयोजित करण्यात येतो. अधिक मासानिमित्त तो आज आयोजित करण्यात आला. यावेळी दैवज्ञ ब्राह्मण समाजातील सुमारे 60 महिलांनी या कुंकुमार्चन सोहळ्यात भाग घेतला. यावेळी विविध मंत्रपठण करत धार्मिक विधी करण्यात आले.

या सोहळ्यासंदर्भात माहिती देताना दैवज्ञ ब्राह्मण समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा शुभांगी दयानंद कारेकर यांनी सांगितले की, दरवर्षी श्रावण मासात आम्ही हा कुंकुमार्चन सोहळा आयोजित करीत असतो. मात्र यंदा अधिक मास आल्याने त्यानिमित्त आज हा सोहळा आयोजित केला आहे. यात सुमारे 60 महिलांनी श्रद्धेने भाग घेतला आहे.

कुंकुमार्चन सोहळ्याचे धार्मिक महत्व सांगताना पुरोहित गजानन दिनकर सोमण यांनी सांगितले की, अधिकमास हा पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो. दैवज्ञ ब्राह्मण समाज महिला मंडळातर्फे दरवर्षी श्रावण महिन्यात कुंकुमार्चन सोहळा आयोजित केला जातो. मात्र यंदा पुरुषोत्तम मास आणि अधिक मास आल्याने अधिकमासात हा सोहळा आयोजित केला आहे. अखंड सौभाग्य, सुख-शांती-समृद्धी लाभावी या हेतूने कुंकुमार्चन सोहळा केला जातो. घरीसुद्धा आपण कुलदेवतेचा कुंकुमार्चन सोहळा साजरा करू शक्ती. त्याचे फळ निश्चित प्राप्त होते असे त्यांनी सांगितले. .

यावेळी सहभागी महिलांनी मंत्रपठण करत विविध धार्मिक विधी करत देवीला कुंकुमार्चन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दैवज्ञ ब्राह्मण समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा शुभांगी दयानंद कारेकर, उपाध्यक्षा सुलभा सुभाष कारेकर, खजिनदार शैलजा दामोदर कारेकर, सचिव नीता राजेंद्र शिरोडकर, उपखजिनदार नम्रता श्रीधर महागावकर तसेच सदस्या व जालगार गल्ली श्री कालिकादेवी मंदिर व्यवस्थापन समितीने परीश्रम घेतले.

Tags: